एलियन्स अण्वस्त्रांपर्यंत पोहचलेत, तिसऱ्या महायुद्धाचा धोका; माजी लष्कर प्रमुखांचा दावा

एलियन्स आहेत की नाहीत, याबाबत साशंकता असतानाच आता एलियन्स अण्वस्त्रांपर्यंत पोहचल्याचा दावा अमेरिकेतील एका माजी लष्कर प्रमुखांनी केला आहे. मेटल मोनोलिथमुळे एलियन्सची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर एलियन्स प्राचीन काळापासून मानवजातीला मदत करत असल्याचा दावा एका प्रसिद्ध गायकाने केला होता. आता माजी लष्करप्रमुखांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा एलियन्सची चर्चा सुरू झाली आहे.

एलियन्स अण्वस्त्रांपर्यत पोहचले असून त्यांच्यामुळए तिसऱ्या महायुद्धाचा धोका असल्याचा दावा अमेरिकेच्या माजी लष्करप्रमुखांनी केला आहे. तसेच एलियन्स अण्वस्त्रांसोबत छेडछाड करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. याबाबत आपण लवकरच पुरावे देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लष्कर प्रमुखांसोबतच अमेरिकेचे माजी हवाई दलातील अधिकारी रॉबर्ट सालास यांनी याबाबत माहिती दिली आहे. 24 मार्च 1967 रोजी आपली 10 आंतरमहाद्विपातील बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे निष्क्रिय झाली होती. त्यावेळी आपण मोंटानामधील माल्मस्ट्रॉम एअर बेसवर भूमिगत लाँच सिस्टमवर ऑन ड्युटी कमांडर म्हणून कार्यरत होतो.

एलियन्सने अण्वस्त्रांच्या ठिकाणी पोहचून विविध क्षेपणास्त्रे निष्क्रिय केल्याचा दावाही सालास यांनी केला आहे. तसेच एलियन्सनी काही क्षेपणास्त्रे लाँचही केली होती. मात्र, त्याची उलटगणना सुरू करण्याआधीच ते रोखण्यात यश आले. तसेच त्या घटनेच्या आठ दिवस आधीही 16 मार्च 1967 रोजी आणखी एक मिसाईल सिस्टिम लाँच झाली होती. अशाप्रकारे एलियन्स तिसरे महायुद्ध घडवू शकतात, असा धोक्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आता रॉबर्ट सालास यांच्यासोबत चार माजी सैन्य अधिकारी अण्वस्त्रांबाबत एलियन्स करत असलेल्या छेडछाडीची माहिती देणार आहेत. तसेच ते याबाबतचे पुरावेही देणार आहेत. ते 19 ऑक्टोबरला याबाबत माहिती आणि पुरावे देण्यासाठी एक पत्रकार परिषद घेणार आहेत. ‘डेली स्टार’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. गेल्या काही दशकात घडलेल्या अनाकलनीय घटनांसाठी एलियन्स जबाबदार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या