ऑल इग्लंड चॅम्पियनशिपमध्ये सिंधूचा पराभव

16

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती आणि हिंदुस्थानची स्टार खेळाडू पीव्ही सिंधूला ऑल इग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधून गाशा गुंडाळावा लागला आहे. बॅडमिंटनमधील जगातील पहिल्या क्रमांकाची चीनी ताईपेची खेळाडू ताए जू यिंगनं उपांत्यपूर्वफेरीमध्ये सिंधूचा २१-१४, २१-१० अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

खेळाच्या सुरुवातीपासूनच सिंधूमध्ये आत्मविश्वासाची कमतरता जाणवत होती. नेटजवळ केलेल्या चुकांमुळे सिंधूला पहिला सेट २१-१४ असा गमवावा लागला. दुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीला प्रतिकार केल्यानंतर सिंधूचा खेळ संथ झाला, याचा फायदा उठवत यिंगनं जोरदार स्मॅशचा वापर करत दुसरा सेट २१-१० असा खिशात घातला आणि सामनाही जिंकली.

सामना हरल्यामुळे सिंधूच्या उपात्यफेरीत जाण्याच्या आशेवर पाणी पडलं आहे. आता हिंदुस्थानच्या सर्व आशा फुलराणी सायना नेहवालवर टिकून आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या