…आता मशीद बांधण्यासाठी मंदीर उध्वस्त करू, इमामाचे हिरवे फूत्कार

4037

अयोध्येत राम मंदिराचा भव्य दिव्य भूमीपूजन सोहळा नुकताच पार पडला. या भूमी पूजनावरून एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधल्यानंतर आता ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजिद रशिदी यांनी तर थेट मंदिर पाडण्याची धमकीच दिली आहे.

साजिद रशिद यांनी एका मुलाखतीत राम मंदिराबाबत बोलताना हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘इस्लामनुसार एखादी मशिद ही कायम मशिदच राहते. त्या जागी तुम्ही दुसरं काही बांधू शकत नाही. आम्ही असं मानतो की तिथे मशीद होती व कायम राहील. ती मशिद मंदिर पाडू बांधलेली नव्हती. मात्र आता कदाचित मंदिर पाडून मशिद बांधली जाईल’, अशी धमकीच ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजिद रशिद यांनी दिली आहे.

बुधवारी भूमिपूजन कार्यक्रमानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. या कार्यक्रमात मोदींच्या सहभागावर सवाल उपस्थित करत त्यांनी लोकशाहीचा पराभव झाल्याचे विधान केलेले. ‘मी सुरुवातीपासून पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात सहभागी होऊ नये अशी भूमिका मांडत आलो आहे. कारण ते कोणत्या विशिष्ट समाजाचे पंतप्रधान नाहीत, आणि हिंदुस्थानचा लोकशाही हा एकच धर्म असून आज याचा पराभव झाला’, असे ओवैसी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या