आता ऑनलाईन भरता येणार इन्कम टॅक्स रिटर्न

सामना ऑनलाईन । मुंबई

नोकरदारांना आता इन्कम टॅक्स रिटर्न भरने अधिक सोयीचे होणार आहे. त्यासाठी ऑल इंडिया आयटीआरने एक मोबाईल अॅप आणले आहे. ‘इन्कम टॅक्स रिटर्न फायलींग अॅप बाय ऑल इंडिया आयटीआर’ नावाच्या अॅपचा वापर करून इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाईन भरता येणार आहे. हे अॅप अननुभवी आणि अनुभवी अशा दोन्ही करदात्यांसाठी उत्कृष्ट असल्याचे बोलले जात आहे.