पीकविमा मागणीसाठी सर्वपक्षीय ‘जिल्हा बंद’ला उत्स्फुर्त प्रतिसाद

112

सामना प्रतिनिधी । परभणी

पीक विम्याच्या लाभापासून हजारो शेतकरी वंचित राहिल्याने या प्रश्नी गुरूवारी पुकारण्यात आलेल्या बंदला जिल्हाभरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या आंदोलनामध्ये सक्रीय सभाग नोंदविला. या बंदमुळे प्रशासनाचे लक्ष वेधले असून या बंदच्या आंदोलनापाठोपाठ उद्या ६ जुलै रोजी रास्तारोको आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले. काही अपवाद वगळता हा बंद कडकडीत होता. शहरासह जिल्हाभरात या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

पीक विम्याच्या प्रश्नावर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आंदोलन उभे केले आहे. २५ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरु असून या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या अंतर्गत गुरुवारी जिल्हाबंदची हाक दिली होती. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनीही या आंदोलनाचा पाठिंबा दर्शविला आहे. शहरात सकाळी १० च्या सुमारास बाजारपेठेतील काही दुकाने उघडली होती; परंतु एक ते दीड तासानंतर ही दुकाने बंद करण्यात आली. बाजारपेठ भागातील सर्व दुकाने बंद राहिली.

व्यापारी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष सूर्यकांत हाके, सचिन अंबिलवादे, संजय मंत्री, नितीन वट्टमवार, नंकिशोर अग्रवाल, रमेश पेकम, अनिल हाराळ, राजेंद्र सोनी, हनुमानदास कालानी, प्रल्हाद कानडे, मनोज माटरा, राजेभाऊ धुळे आदींनी उपोषणस्थळी बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला. जिल्ह्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, माजीमंत्री सुरेश वरपुडकर यांनी शासनाचे परिपत्रक हे दिशाभूल करणारे असल्याचे सांगत महसूल विभाग ५० टक्के पेक्षा आणेवारी कमी असल्याचे सांगतले. याउलट विमा कंपनी मात्र आणेवारी ५० टक्के पेक्षा अधिक सांगत असल्याने नुकसान भारपाई देण्यास कंपनी टाळाटाळ करत आहे. एकंदरीत सर्वच प्रकार चुकीच्या पद्धतीने चालले आहे. एकूण पेरणीवर देखील अनुमान काढले जात आहे. शेतकऱ्यांना पीकविमा मिळालाच पाहिजे, अशी आपली ठाम भूमिका असून शेतकरयांना विमा देण्यास विमा कंपनीस भाग पाडू, असे यावेळी बोलताना वरपुडकर म्हणाले. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडून स्थगन प्रस्ताव आणून शेतकर्यांच्या मागण्या संदर्भात सभागृहात मांडू, असे सांगीतले. शेतकरी आंदोलनस्थळी जाऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे असल्याचे यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी व्यापारी खंबीरपणे उभे असल्याचे तसेच आंदोलन तीव्र करणार असल्याचे या असोसिएशनचे पदाधिकारी सूर्यकांत हाके यांनी बोलताना सांगीतले. सोनपेठ, पूर्णा, जिंतूर, मानवत, पाथरी आणि सेलूतही बाजारपेठ कडकडीत बंद राहिली. उद्या होणाऱ्यारास्तारोको आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर एस.टी. महामंडळ देखील हातराखून गाड्या सोडण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पूर्णा : येथील शाळा, महाविद्यालये, व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले, तालुकाप्रमुख काशिनाथ काळबांडे, शहरप्रमुख नितीन कदम, नगरसेवक श्याम कदम, संतोष एकलारे, माजी जिल्हाप्रमुख सुधाकर खराटे, माजी नगरसेवक साहेब कदम, नगसेवक अ‍ॅड. राजू भालेराव, उपतालुकाप्रमुख बालाजी वैद्य, उपशहरप्रमुख शंकर गलांडे, रामेश्वर हिंगे, मुंजा कदम, गिरधर शिंदे, गोविंद ठाकर, रमेश ठाकूर, सुदाम ढोणे, ह.भ.प. सोपानकाका बोबडे, दशरथ बोबडे, पिसाळ, पिराजी जगताप, विष्णू कदम, गणेश कदम आदींसह पदाधिकारी

सोनपेठ : सोनपेठ शहरातील बाजारपेठ १००टक्के बंद ठेऊन व्यापारी महासंघांने शेतकऱ्यांच्या मागणीस पाठिंबा दिला. यावेळी तालुक्यातील शाळा महाविद्यालये ही सोडुन देण्यात आली. दुपारी शिवसेना व पीकविमा संघर्ष समितीच्या वतीने सोनपेठ तहसीलदारांना निवेदन दिले. या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे शिवाजी कदम, शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदू, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे, तालुकाध्यक्ष रंगनाथ रोडे, भगवान पायघन, भागवत पोपडे, राष्ट्रवादीचे दिनकर तिथे, भगवान राठोड, नगरसेवक सुनील बर्वे, विश्वंभर गोरवे, व्यापारी महासंघाचे कृष्णा कुसुमकर, माऊली जोगदंड, अंगद काळे, आण्णा जोगदंड, रामेश्वर भोसले, राजेश कदम, भागवत मुलगीर, विष्णू मुलगीर, गणेश पांडुळे, बालासाहेब सावंत, मधुकर फड, मुरली बहादुर, राजाराम बर्वे, राजाभाऊ राठोड, बाबासाहेब गर्जे, गोपीनाथ जाधव, विनोद देशपांडे, रामराव मोकाशे यांच्यासह मोठ्या संख्येने सर्वपक्षीय कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

मानवत : येथील शिवसेना व शेतकरी सुकाणु समितीच्या वतीने शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्यारिलायन्स कंपनीवर गुन्हा दाखल करुन शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम तात्काळ वाटप करावी यासाठी शहरातील बाजार पेठ बंद ठेऊन तहसीलदार निलम बाफना यांना निवेदन देण्यात आले. रिलायन्स कंपनी, जिल्हाधिकारी परभणी, कृषी अधिक्षक परभणी यांनी संगनमतानी केंद्र सरकारचे नियम धाब्यावर ठेवून परभणी जिल्हातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिक विम्यापासून वंचित ठेवण्यात आले. यावेळी माकप चे लिंबाजी कचरे पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख राजेश कच्छवे, माकप लिंबाजी कचरे, शेतकरी सुकाणू समिती अध्यक्ष बाळासाहेब आळणे, सचिव रामराजे महाडीक, नगरसेवक दिपक बारहत्ते, प. स. उपसभापती संतोष जाधव, माजी शहरप्रमुख अनिल जाधव, बालाजी दहे, नगरसेवक दत्ता चौधरी, शंकर तरटे, बळीराम माने, राम दहे, सचिनसिंह चौहाण, रमेश साठे, भगवान मुळे, उद्धव काळे, गोपाळ काळे, वामन चव्हाण, भगवान कचरे, हरि चटाले, ओम राऊत, आनंद भक्ते, नारायण धबडगे, परमेश्वर मसलकर, महादेव पिंपळे, लक्ष्मण रोडे, प्रभाकर सुगर, भागवत शिंदे, बळीराम गोरे, संतोष लाडाणे, बालाजी जाधव, पांडुरंग मुळे, विष्णू जाधव व शेतकरी बांधव, शिवसेना शाखाप्रमुख, बुथप्रमुख, शिवसैनिक, सुकाणु समिती पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जिंतूर : सर्वपक्षीय परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. शिवसेनेच्या वतीनेही आज रोजी जिंतूर शहर बंद ठेवण्याचे व्यापाऱ्यांना आवाहन करून जिंतूर बंद करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. सरकारने परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा पिक विमा तत्काळ मंजूर करून तो वितरीत करण्यासंदर्भात संबंधितास आदेशित करावे. अन्यथा शासनाच्या या कृतीचा निषेध म्हणून आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. यातून निर्माण होणाऱ्याकायदा व सुव्यवस्था सारख्या प्रश्नांची संपूर्ण जबाबदारी सरकारवर राहील, असा इशाराही तहसीलदार यांना यावेळी निवेदनात देण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मनोज थिटे, प्रसादराव बुधवंत, जि.प. अध्यक्ष विश्वनाथ राठोड, जि.प. सदस्य अविनाश काळे, रामराव उबाळे, विठ्ठल घोगरे, प.स.सभापती मधुकर भवाळे, उपसभापती विजय खिस्ते, प.स. सदस्य प्रल्हादराव ढोणे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, नगरसेवक मनोहर डोईफोडे, शाहेद बेग मिर्झा, उस्मान खा पठाण, आहेमद बागबान, शोएब जानिमिया, दत्ता काळे, विनोद राठोड, संदीप राठोड, सचिन स्वामी, मकसूद पठाण, आनंतराव देशमुख, रवी काजळे, शिवसेना तालुका प्रमुख, भारत पवार, कांता धानोरकर, ठोबरे, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

सेलू : शेतकऱ्यांना हक्काचा पीकवीमा मिळण्यासाठी नोकऱ्या सरकारच्या विरोधात सर्वपक्षीय सेलू शहर बंदची हाक देण्यात आली होती. या आवाहनाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपआपली दुकाने बंद ठेवून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या बंदमध्ये जि. प. अर्थसभापती अशोकराव काकडे, शिवसेनेचे गटनेते राम पाटील, काँग्रेसचे मिलिंद सावंत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, पंचायत समितीचे सभापती पुरूषोत्तम पावडे, पवन आडळकर, विनोद तरटे, मनिष कदम, पत्रकार अशोक अंभोरे, जयसिंग शेळके, माकपचे कॉ.रामकृष्ण शेरे, दत्तुसिंग ठाकूर, माऊली ताठे, बजरंग आरकुले, भारत इंद्रोके, सुनील गायकवाड, गौतम कनकुटे, गोविंद शर्मा, अक्षय दिग्रसकर आदींसह हजारो नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या