कोरोना संकटामुळे दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम रद्द

कोरोना संकटामुळे रविवारी ( 25 ऑक्टोबर) धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर कोणेतेही कार्यक्रम होणार नाहीत. कोरोना फैलावाची शक्यता लक्षात घेत धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे 63 वर्षांची ऐतिहासिक परंपरा खंडित होणार आहे.

कोरोना संकटामुळे दीक्षाभूमीवरील 14 ऑक्टोबरचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यामुळे अनुयायांना दीक्षाभूमीला बाहेरुनच अभिवादन करावे लागले होते. केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थित यंदा दीक्षाभूमीवर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला अनुयायांना प्रवेश देण्यात येणार नाही. दरवर्षी विजयादशमीसह 14 ऑक्टोबरला दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त विविध कार्यक्रम होतात. त्यावेळी मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित असतात. यंदा कोरोना संकटामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

घरी राहूनच धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्याचे आवाहन
नागपूरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे यंदा सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी दिली आहे. दीक्षाभूमीवरील कार्यक्रम वृत्तवाहिन्यांसह युट्युब चॅनेलवर पाहता येतील, असेही फुलझेले यांनी सांगितले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक अनुयायाने आपल्या घरी राहूनच धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या