पीएनबी बँकेनंतर भूषण स्टील कंपनीचा अलाहाबाद बँकेला हजारो कोटींचा चुना

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भुषण स्टील कंपनीने पीएनबी कंपनीला चुना लावल्यानांतर आता अलाहाबाद बँकेला चुना लावला आहे. या प्रकरणी बँकेने आरबीआयकडे तक्रारही केली आहे.

भुषण स्टील कंपनीने एक हजाअर 775 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे अलाहबाद बँकेने आरबीआयला म्हटले आहे. या प्रकरणी बँकेने कंपनीच्या संचालकांविरोधात आरबीआयकडे पुरावेही सादर केले आहे. भुषण स्टील कंपनीने बँकींग व्यवस्थेच्या माध्यमातून 1 हजार 774.82 कोटींचा घोटाळा केल्याचे बँकेने म्हटले आहे.

गेल्या आठवड्यातच पंजान नॅशनल बँकेनेही भुषण स्टील कंपनीविरोधात 3 हजार 805 कोटींचा चुना लावल्याची तक्रार केली होती. भुषण कंपनीने निधी गोळा करण्यासाठी दस्तऐवजांमध्ये हेराफेरी केली होती असे तपासात निष्पण्ण झाले होते. पीएनबी बँकेने याची माहिती आरबीआयसह शेअर मार्केटलाही दिली होती.

अलाहबाद बँकेने म्हटले की भूषण स्टील कंपनीने त्यांच्या निधीची दुरुपयोग केला आहे. तसेच त्यांच्या हिशोबात गडबड दाखवली आहे जेणेकरून त्यांना बँकेकडून निधी गोळा करता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या