शंभर वारकाऱयांसह माऊलींची पालखी पंढरपूरला नेण्यास परवानगी द्या

273
mumbai bombay-highcourt

जगभरात थैमान घालणाऱया कोरोनाचे सावट यंदा पंढरपूरच्या आषाढी वारीवरही पडले आहे. कोरोनामुळे सांस्पृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानल्या जाणाऱया पायीवारीला यावर्षी बंदी घालण्यात आली आहे.

वर्षानुवर्षे सुरू असलेल्या वारीच्या परंपरेत खंड पडू नये यासाठी शंभर वारकऱयांना माऊलींची पालखी वाखरी ते पंढरपूर नेण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी करत वारकरी सेवा संघाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे या याचिकेवर आज मंगळवारी न्यायामूर्ती उज्वल भुयान आणि न्यायामूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या