मोबाईलमध्ये ‘हे’ अॅप इन्स्टॉल केले नसतील, तर अताच करा; संकटात पडेल उपयोगी…

कोरोना संकटात बरीच कामे ऑनलाईन तसेच वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहेत. अशातच सरकारी कामेही अॅपच्या माध्यमातून सहजरित्या घरच्या घरी करता येऊ शकतात. यामुळे बऱ्याच वेळेचीही बचत होते. याठीच आज आम्ही तुम्हाला एका अशा अॅपबद्दल माहिती सांगणार आहोत जे तुम्हाला तुमच्या संकटकाळी खूप उपयोगी पडू शकते. चला तर जाणून घेऊ या अॅपबद्दल…

Arogya Setu

राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच अनेक शासकीय कार्यालयात किंवा इतर अशा बऱ्याच ठिकाणी प्रवेश करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये Arogya Setu हे अॅप असणे खूप गरजेचं आहे. हे अॅप नसल्यास तुम्हाला बऱ्याच ठिकाणी प्रेवश करण्यापासून रोखलं जाऊ शकत. या अॅपच्या माध्यमातून कुटुंबियांकरिता लसीकरणाबाबत सहजरित्या माहिती मिळू शकते, तसेच लस घेण्याकरिता परवानगीही मिळवू शकता.

MyGov App

सरकारी कार्यालयातील विभागांविषयीची MyGov App या अॅपच्या माध्यमातून मिळते. तसेच कोणत्याही सरकारी कामकाजाकरिता आवश्यक असलेल्या सूचनाही या अॅपद्वारे कळू शकतात.

Umang App

Umang App म्हणजे Unified Mobile Application For New Age Governance हे अॅपही मोबाईलमध्ये असणे गरजेचे आहे. या अॅपच्या माध्यमातून आरोग्यविषयक, आर्थिक आणि घराबाबत आवश्यक असलेली माहिती मिळते. याव्यतिरिक्त तुमच्या पीएफसंदर्भातील माहितीही या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. शिवाय सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीची माहितीही यामध्ये दिली जाते.

Digilocker App

डेटा लिक होणे किंवा गोपनीय माहितीकरिता सरकारने डीजीलॉकर अॅप तयार केले. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमची महत्त्वपूर्ण कागदपत्रे डिजिटल कॉपीच्या स्वरुपात ठेवू शकता.

mParivahan App

mParivahan App हेही एक महत्त्वाचे सरकारी अॅप आहे. या अॅपच्या मदतीने तुम्हीची कार किंवा बाईक यांची माहिती मिळवू शकता. विशेष म्हणजे यामध्ये तुम्हाला तुमच्या गाडी किंवा बाईकचे महत्त्वाचे कागदपत्रे ही ठेवता येतात.

आपली प्रतिक्रिया द्या