मणी खाली बसा, नाही तर अमरसिंह येईल!

77

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘नीच आदमी’ संबोधणारे माजी केंद्रीय मंत्री मणीशंकर अय्यर यांचे काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले असून सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह यांनी देखील आपली प्रतिक्रिया देतांना राजकारणात अनेक जण मणी पीडित असल्याचं म्हटलं आहे.

मणीशंकर अय्यर यांनी उमा भारती, दिवंगत नेत्या जयललिताजी आणि अनेक बड्या नेत्यांना त्रास दिला असून आपणही त्यांच्यामुळे त्रासलो होतो, असं अमरसिंह यांनी म्हटलं आहे. एकदा माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे बंधू गजरल गुजराल यांच्या घरी मद्यपान केल्यानंतर नशा चढलेल्या मणीशंकर यांनी अत्यंत क्रूर शब्द वापरले. त्यामुळे आमची ऐतिहासिक हाणामारी झाली होती. तो प्रसंग साऱ्यांना इतका लक्षात राहिला, की त्यानंतर मणीशंकर अय्यर संसदेच्या सभागृहात कोणाविषयी चुकीचं बोलू लागले की भाजपवाले त्यांना म्हणायचे ‘मणी बैठ जा, नही तो अमरसिंह आजाएगा।’, अशी माहिती खुद्द अमरसिंह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

मणीशंकर अय्यर यांच्या वाचाळतची अनेक उदाहरणे जनतेला माहीत आहेत. मात्र त्यावर अमरसिंह यांनी टीका केल्यानं पुन्हा एकदा मणीशंकर आणि अमरसिंह यांच्या शाब्दिक हाणामारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या