अमरावतीतील नागरिकाचा नागपूरमध्ये कोरोनामुळे मृत्यू, एका नव्या रुग्णाची नोंद

अमरावती येथील रुक्मिणीनगर भागात राहणार्‍या ६५ वर्षीय पुरुषाच्या नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज पहाटे ६ वाजता मृत्यू झाला. त्यामुळे अमरावतीत कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या १७ झाली आहे. तर आज सकाळी आलेल्या अहवालात येथील सराफा बाजारात राहणार्‍या २४ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाग्रस्ताची संख्या २५८ झाली असून आज दुपारपर्यंत एकच रुग्ण कोरोनाग्रस्त आढळल्याचे आशादायी चित्र होते.

नागपूर येथे दगावलेल्या इसमाला सारीचा आजार झाल्यामुळे नागपूर येथील रुग्णालय भर्ती करण्यात आले होते. २ जून रोजी त्याची चाचणी घेण्यात आली त्यात सदर इसमाची चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना कोविड वार्डात भर्ती करण्यात आले होते मात्र त्यांचे आज सकाळी निधन झाले.

दरम्यान २५८ पैकी प्रत्यक्षात ९३ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. यापैकी ४ जण नागपूर येथे उपचार घेत आहे. सध्या १४८ रुग्ण बरे झाले असून त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ३४३ नागरिकांनी तपासणी करण्यात आली तसेच आतापर्यंत ४ हजार ९२७ जणांची थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविले त्यापैकी ४ हजार ४९० जणांचे अहवाल निगेटिव आले आहे. तर २७० जणांचे अहवाल पॉजीटीव आले आहे. सध्या ६० नागरिकांचे अहवाल प्रलंबित असून १२१ नमूने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या