अमरावतीत मृत्यू झालेला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

809

अमरावती येथील एका नागरिकाचा 2 एप्रिल रोजी इर्विन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या व्यक्तीचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

काही दिवसांपूर्वी हा नागरिक अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल होता. या नागरिकाला न्यूमोनिया असल्याचे निदान खासगी डॉक्टरांनी केले होते. रुग्णाला श्वसनक्रियेत अडथळे येत असल्याचे निदर्शनास आल्यावरून खासगी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला इर्विन येथे दाखल करण्याचे निश्चित झाले होते परंतु तत्पूर्वीच उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

मृ्त्युपूर्वी श्वसनक्रियेत अडथळे येत असल्याने या मृत्यू पावलेल्या रुग्णाचे घशाच्या स्रावाचे नमुने स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी, स्वॅब व इतर आवश्यक प्रक्रिया केली जात आहे. नागरिकांनी दक्षतेचे पालन करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. ताप, खोकला आदी कुठलाही त्रास जाणवत असल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. घाबरून न जाता दक्ष राहावे. आपल्यासह इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या