अमरावतीतील रुग्णालयाच्या ICU ला आग, दोन बालके जखमी

अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या ICU ला आग लागली होती. यानंतर तात्काळ अग्निशामक दल रुग्णालयात दाखल झालं व ती आग विझवण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही मात्र दोन बालके किरकोळ जखमी झाली आहेत. जखमींना तातडीने पंजाबराव देशमुख रुग्णालयात हलविले आहे.

या घटनेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयाला भेट देत घटनास्थळाची पाहणी केली.