हर हर महादेव… अमरनाथ यात्रेकरुंचा पुढचा जत्था रवाना

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदूचे श्रद्धास्थान असलेल्या जम्मू-कश्मीरातील अमरनाथ यात्रेवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना न जुमानता शिव भक्तांचा दुसरा जत्था मंगळवारी सकाळी रवाना झाला. हर हर महादेवच्या गजरात आज पहाटे ३ वाजता भाविकांनी भरलेली बस पहलगाम व बालटालकडे रवाना झाली.
दरम्यान, सोमवारी अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या जत्थाच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
सोमवारी अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. यात ७ जण ठार व ३४ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर दुसरा जत्था यात्रेस जाणार की नाही अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. पण दहशतवादयांच्या हल्ल्याला न घाबरता मोठ्या हिंमतीने शिव भक्त यात्रेस निघाले आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या