फेस्टिवल सेलच्या माध्यमातून फ्लिपकार्ट ऍमेझॉनने कमवले कोट्यवधी रुपये

563

ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट या लोकप्रिय ई कॉमर्स साईट्सनी फेस्टिवल ऑफरच्या माध्यमातून कोट्यवधींचा नफा मिळवला आहे. दोन्ही कंपन्यांनी सहा दिवस हा सेल ठेवला होता. दोन्ही साईट्सनी फक्त तीन दिवसांत 19 हजार कोटींचा व्यवसाय केला आहे. मंगळवारी जाही झालेल्या एका अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे.

सण उत्सवांच्या पार्श्वभुमीवर दोन्ही कंपन्यांनी हा सेल ठेवल होता. आता पुन्हा दिवाळी सण आहे. तर हा व्यवसाय 39 हजार कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आर्थिक मंदी असताना ग्राहकांनी या सेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. ही बाब आर्थिकदृष्ट्या चांगली असल्याचे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या