मंदीबाईचा फेरा आला… अॅमेझॉन वितरण सेवा बंद करणार, देशातील हजारो कर्मचाऱयांच्या नोकरीवर गदा

ट्विटर, फेसबुक आणि गुगलपाठोपाठ जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स पंपनी अॅमेझॉनलादेखील मंदीचा मोठा फटका बसला आहे. फूड डिलिव्हरी आणि ई-लर्निंग प्लॅटफॉर्मनंतर अॅमेझॉन आता हिंदुस्थानातील वितरण सेवा बंद करण्याच्या तयारीत आहे. पंपनी आता छोटे व्यापारी आणि पंपन्या यांना होलसेल दरात वस्तू पोहोचवण्याची सेवा बंद करणार असून केवळ रिटेल म्हणजेच उद्योजकांकडून थेट ग्राहकांना विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवणार आहे. पंपनीच्या या निर्णयामुळे हिंदुस्थानातील हजारो कर्मचाऱयांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता आहे.

खर्च कमी करण्यासाठी पंपनीने कर्मचारी कपातीचा आणि तोटय़ात असलेले व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक मंदीचा मुकाबला करण्यासाठी पंपनीने आता केवळ आपल्या रिटेल व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे.

अॅमेझॉनची वितरण सुविधा सध्या बंगळुरू, हुबळी आणि म्हैसूरसारख्या शहरांमध्ये कार्यरत आहे. पंपनीच्या या सेवेत सध्या 50 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. पंपनी तिच्या वितरण सुविधेद्वारे किरकोळ व्यापाऱयांना वस्तूंचा पुरवठा करत होती. अॅमेझॉन वितरण सेवा बंद करण्याबाबत पंपनीने अद्याप अधिकृतरीत्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.