अंबाजोगाईत गरजवंतांना शिवसेनेचा आधार, 500 कुटुंबियांना मदत

606

कोरोनाच्या भीषण संकटामध्ये हातावर पोट असणाऱ्या मजुरांची आणि गरिब लोकांचे हाल होत आहेत. अशा कठीण परिस्थितीत शिवसेना त्यांचा आधार बनत आहे. अंबाजोगाईमध्ये माजी उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी यांनी 500 सर्व सामान्य कुटुंबियांना मदत केली. केवळ धान्यच नव्हे तर जीवनावश्यक वस्तुने परिपूर्ण असणारे कीट प्रत्येक कुटुंबियांना दिले.

राज्यात आता फक्त दोन झोन, रेड झोन वगळता दुसऱ्या झोनमध्ये काही निर्बंध शिथील

कोरोना विषाणुच्या संकटाने काय खावे याची चिंता सामान्य लोकांना लागली आहे. तीन महिन्यापासून लॉकडाऊन आहे. हाताला काम नाही. मिळालेली मदत संपत आहे. अशा परिस्थितीत शिवसेना मदतीला धाऊन आली. माजी उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी यांनी अंबाजोगाईतील 500 कुटुंबियांना परिपूर्ण असणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंचे कीट वाटप केले. या किटमध्ये आठ ते नऊ वस्तुंचा समावेश आहे. शिवसेनेची ही मदत हातावर पोट असणाऱ्या सामान्य नागरिकांना लाख मोलाची ठरत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या