रिटायरमेंटनंतर यू-टर्न, ‘या’ खेळाडूला टीम इंडियाकडून पुन्हा खेळायचंय

1370

रिटायरमेंट घेतल्यानंतर अनेक खेळाडूंना पुन्हा संघाकडून खेळावसं वाटतं. काही खेळाडूंनी तशी संधीही मिळाल्याची उदाहरण क्रिकेट इतिहासात आहेत. आता अशीच संधी हिंदुस्थानच्या एका खेळाडूला मिळते का हे पाहावे लागेल. कारण विश्वचषकादरम्यान निवृत्ती जाहीर केलेल्या एका खेळाडूला हिंदुस्थानकडून पुन्हा खेळायचं आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने हा विचार बोलून दाखवला आहे.

विश्वचषकात संधी न मिळाल्याने टीम इंडियाचा मधल्या फळीतील खेळाडू याने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. 3 जुलैला रायडूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. परंतु आता दोन महिन्यानंतर मात्र त्याने यू-टर्न घेतला असून पुन्हा हिंदुस्थानकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘स्पोर्ट्सस्टार’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रायुडूने हे वक्तव्य केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

टीम इंडियासह मला आयपीएलमध्येही खेळायचे आहे, असे रायडू या मुलाखतीमध्ये म्हणाला. रायडू सध्या तामिळनाडू येथे एक स्पर्धा खेळत आहे. या स्पर्धेदरम्यान रायडूची मुलाखत घेतल्याचे म्हटले जात आहे.

दमदार कामगिरी

रायुडू टीम इंडियाकडून 55 एक दिवसीय लढतीत 3 शतक आणि 10 अर्धशतकांसह 47 च्या सरासरीने 1694 धावा चोपल्या आहेत. रायडूला टी इंडियाकडून 6 टी-20 खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने 42 धावा केल्या. तसेच प्रथम श्रेणीच्या 97 लढतीत त्याच्या नावावर 6151 धावा आहेत, तर लिस्ट-ए च्या 160 लढतीत 5100 धावांची नोंद रायडूच्या नावावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या