अॅम्ब्युलन्समधील बालकाला मध्येच उतरवून चालक पसार, बाळाचा मृत्यू

983

नवजात बालकाची प्रकृती गंभीर असल्याने घनसावंगी ग्रामीण रुग्णालयातून त्याला जालना जिल्हा रुग्णालयात हलविण्यास डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानुसार मुलाची आई बाळाला घेऊन अॅम्ब्युलन्सने जालनासाठी रवाना देखील झाली. मात्र अॅम्ब्युलन्स चालकाने बाळाला व त्याच्या आईला अंबडच्या ग्रामीण रुग्णालयात सोडून पोबारा केला. त्यामुळे तत्काळ पुढील उपचार न मिळाल्याने बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

तीर्थपुरी येथील रुखैया समीर शेख (२६) ही महिला १ मे रोजी प्रसूतीसाठी तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली होती. तेथील डॉक्टरांनी गर्भातील बाळ आडवे झाल्याने त्यांना घनसावंगी येथे जाण्याचा सल्ला दिला. सदर महिला पतीसह घनसावंगी येथील ग्रामीण रुग्णालयात गेली असता तेथे त्यांनी बाळाला जन्म दिला. परंतु बाळाची तब्येत नाजूक असल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांना जालना येथील सरकारी दवाखान्यात जाण्यास सांगितले. त्यांच्यासाठी रुग्णावाहिकेचीही सोय केली. मात्र रुग्णवाहिकेच्या चालकाने बाळ व बाळंतिणीला जालना ऐवजी अंबडच्या ग्रामीण रुग्णालयात रात्री 8 वाजता सोडले. महिलेने जालनाला जाण्याची विनंती केली मात्र त्याने मला इथपर्यंतच सोडण्यास सांगितले आहे असे सांगून तो निघून गेला. जाताना रुग्णवाहिकेच्या चालकाने त्यांच्याकडून रेफर पत्रावर अंबड असे लिहले. नंतर बाळ व बाळंतीनीला अंबड येथील दवाखान्यात गेले असता त्यांना तपासून जालना येथे जावे लागेल असे सांगितले.अंबड येथील दवाखान्यात रुग्णवाहिका नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकाने इतरत्र शोध घेऊनही त्यांना खाजगी रुग्णवाहिका किंवा वाहन मिळाले नाही. साडेतीन तास रुग्ण उपचाराअभावी बसून होते. अखेर रात्री ११. ३० वाजता रुग्णालयाची रुग्णवाहिका आल्यावर त्यांना जालना येथे नेले. तेथे रात्रभर उपचार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी २ मे रोजी दुपारी तेथील संबधित डॉक्टरांनीत्यांना इथे उपचार होऊ शकत नाही. तुम्ही बाळाला संभाजीनगर येथे किंवाखाजगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. कोरोनामुळे संभाजीनगर रेडझोनमध्ये असल्याने तेथे जाणे शक्य नव्हते. त्यात रुग्णाच्या आईवडिलांचीआर्थिक परिस्थिती नाजूकच असल्याने त्यांनी बाळाला संभाजीनगरला न नेता परत अंबडच्या एका खाजगी दवाखान्यात आणले तेथे उपचार सुरू असतांनाच बाळाचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या