अॅम्ब्युलन्समधील पेट्रोल संपले, अर्ध्या वाटेत गरोदर महिलेचा तडफडून मृत्यू

1329
file photo

देशातील कानाकोपऱ्यात आजही वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत वानवा असल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. मोफत अॅम्ब्युलन्स, एका कॉलवर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या जात असल्याच्या घोषणा जरी होत असल्या तरी एका अॅम्ब्युलन्समुळेच गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ओडीशात उघडकीस आली आहे.

ओडीशातील बारिपाडा येथे गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या अॅम्ब्युलन्समधील पेट्रोल संपल्याने त्या महिलेचा व तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला आहे. या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर तिच्या नवऱ्याने अॅम्ब्युलन्स बोलावून तिला बांगीरीपोशी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रसूती गुंतागुंतीची असल्याने डॉक्टरांनी तिला सरकारी रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा त्या महिलेला अॅम्ब्युलन्सने सरकारी रुग्णालयात नेले जात असतानाच त्या अॅम्ब्युलन्समधील पेट्रोल संपले. दुसऱी अॅम्ब्युलन्स येईपर्यंत बराच वेळ गेला. त्या दरम्यान महिलेचा असह्य कळांमुळे मृत्यू झाला.

 

आपली प्रतिक्रिया द्या