अमीषा पटेल पाकिस्तानी अभिनेत्याच्या प्रेमात ?

बॉलीवूड अभिनेत्री अमीषा पटेल ही पाकिस्तानी अभिनेत्याच्या प्रेमात पडल्याची चर्चा रंगायला लागली आहे. अमीषा पटेल हिने पाकिस्तानी अभिनेता इम्रान अब्बाससोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओनंतर या चर्चांना सुरुवात झाली आहे. अमीषा आणि इम्रान हे दोघे एकमेकांना पूर्वीपासून ओळखत असून हे दोघेहीजण अमेरिकेच्या विद्यापीठात एकत्र शिकायला होते. विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतर हे दोघे एखमेकांच्या सातत्याने संपर्कात होते. इम्रान अब्बास याचे हिंदुस्थानावर प्रचंड प्रेम असून तो तिथल्या चित्रपटसृष्टीत काम करतोय, आम्ही दोघे एकमेकांसोबत चित्रपटाबाबत बरेच बोलत असतो असे अमीषाने म्हटले आहे.

इम्रानसोबत प्रेमसंबंध आहेत का असा प्रश्न विचारला असता अमीषाने सांगितले की माझ्याही कानावर या गोष्टी आल्या. या गोष्टी मूर्खपणाच्या असून या अफवा ऐकल्यानंतर मी त्या हसण्यावारी नेते असं तिने सांगितलं आहे. अमीषा पटेल आणि इम्रान अब्बास यांनी नुकतीच बाहरीनमध्ये भेट झाली होती. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघे भेटले होते. यावेळी या दोघांनी अमीषा पटेलची भूमिका असलेल्या क्रांती या चित्रपटातील एका गाण्यावर व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओनंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती.