अमेरिकींनी इराक सोडा! दूतावासाकडून 3 महत्त्वाच्या सूचना जारी

1328
donald-trump

अमेरिकेने बगदाद विमानतळावर रॉकेट हल्ला करत इराणच्या कुद्रस फोर्सचा टॉप कमांडर मेजर जनरल कासीम सुलेमानी याच्यासह सात जणांचा खात्मा केला. यामुळे दोन्ही देशांतील संघर्ष अधिकच वाढला आहे. इराणने अमेरिकेला जशास तसे उत्तर देत याचा खतरनाक बदला घेतला जाईल असा धमकीवजा इशारा दिल्याने अमेरिकेच्या दूतावासाने इराकमधील आपल्या नागरिकांना तत्काळ इराक सोडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच तीन महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

बगदादमध्ये स्थिती बिघडल्याने अमेरिकेच्या दूतावासाने एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकातून अमेरिकेच्या नागरिकांना सल्ला वजा आवाहन करण्यात आले आहे. बगदादमधील स्थिती पाहता अमेरिकन नागरिकांनी इराक सोडून अमेरिकेत परतावे अथवा अन्य देशात आसरा शोधावा, असे त्यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

अमेरिकी दूतावासाने सर्व नागरिकांना तीन गोष्टी लक्षात ठेवण्यास सांगितल्या आहेत

– इराकमध्ये जाऊ नये
– अमेरिकी दूतावासाजवळ जाऊ नये
– प्रत्येक छोट्या-मोठ्या बातम्यांवर बारीक लक्ष ठवणे

us-letter

आपली प्रतिक्रिया द्या