ऑलिम्पिकपदक विजेती लिंडसे वॉन झाली ‘न्यूड’, विवस्त्र फोटो शेअर केला

1783

अमेरिकेची अल्पाईन स्की क्वीन लिंडसे वॉन ही एक उत्कृष्ट खेळाडू आहे. तीन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकलेल्या वॉन हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक विवस्त्र फोटो शेअर केला आहे. तिच्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रसिद्धीच्या वाटेवर आहे. याच संदर्भात तिने हे फोटोशूट केले आहे.

क्रिकेटपटू साराने ‘सारे’ कपडे उतरवले, इन्स्टाग्रामवर विवस्त्र फोटो केला शेअर

1984 ला जन्मलेली लिंडसे वॉन ही जगातील सर्वोत्तम महिला स्की रेसर्स (बर्फातील शर्यत) आहे. तिच्या नावावर तीन ऑलिम्पिक पदकांची नोंद आहे. 2010 मध्ये अमेरिकेमध्ये आयोजित बर्फातील ऑलिम्पिकमध्येही तिने सुवर्णपदक जिंकले होते. विश्वचॅम्पियनशिपमध्ये तिच्या नावावर तब्बल 82 पदकांची नोंद आहे.

lindsey-vonn

2019 मध्ये वयाच्या 34 व्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून निवृत्तीची घोषणा केली. ‘शारिरिक दृष्ट्या आता मी खूप थकले आहे आणि आता मला असे वाटत आहे की निवृत्तीची वेळ आली आहे. तुम्ही माझी कामगिरी कायम लक्षात ठेवाल’, असे तिने स्की रेसमधून संन्यास घेताना म्हटले होते. विशेष म्हणजे शेवटच्या रेसमध्येही तिने कांस्यपदकाची कमाई करत सन्मानाने निवृत्ती घेतली.

टायगर वूडस ते पीके सुब्बान
जगातील सर्वोत्कृष्ट स्की रेसर लिंडसे वॉन ही गोल्फ चॅम्पियन टायगर वूडस याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्याच्यासोबत ब्रेकअक झाल्यानंतर ती आता हॉकी खेळाडू पीके सुब्बान याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सोशल मीडियावर सक्रीय असणारी लिंडसे ही आपले बोल्ड फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रावर तिचे 1.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या