अमेरिका-चीनमध्ये 2025 मध्ये युद्ध भडकणार? अमेरिकेच्या हवाई दलातील जनरलच्या दाव्याची चर्चा

अमेरिकेच्या हवाई दलातील एका जनरने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. अमेरिका आणि चीनमध्ये येत्या दोन वर्षात युद्ध भडकण्याचा दावा या जनरलने केला आहे. त्याच्या दाव्याची जगभरात चर्चा होत आहे. एनबीसीच्या अहवालानुसार याबाबत जनरलने अधिकाऱ्यांना मेमोही पाठवला आहे. 2025 मध्ये अमेरिका आणि चीनमध्ये युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सद्यस्थितीमुळए युद्धाची शक्यता वाढत आहे. तसेच त्यांनी सैन्य अधिकाऱ्यांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

अमेरिकेच्या हवाई दलाचे जनरल माइक मिन्हान यांनी 27 जानेवारीला अधिकाऱ्यांना एक मेमो पाठवला. त्यात त्यांनी या युद्धाची शक्यता वर्तवली आहे. चीनसोबतचे हे युद्ध तैवान मुद्द्यावरून होण्याची शक्यता ही त्यांनी वर्तवली आहे. तसेच सैन्याला युद्धसाठी तयार राहण्याचे निर्देशही दिले आहेत.

अमेरिका आणि तैवानमध्ये 2024 मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे अमेरिका निवडणुकीत गुतंल्याने चीन तैवानच्या दिशएने आगेकूच करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास या परिस्थितीत अमेरिकेला हस्तक्षेप करावा लागेल. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याचा दावा माइक यांनी केला आहे.