इराण, ब्रिटन, मलेशियानंतर आता अमेरिकेचा पाकिस्तानला दणका, घेतला मोठा निर्णय

बनावट पायलट प्रकरणी अमेरिकेने पाकिस्तानला दणका दिला असून पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सवर कारवाई केली आहे. अमेरिकेने पाकिस्तानी पायलटवर बंदी घातली आहे. अमेरिकेच्या परिवहन विभागाने सांगितले की, पाकिस्तानी पायलटच्या लायसेन्स आणि कागदपत्रांच्या सत्यतेबाबत फेडरल एव्हीगेशन एडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) चिंता व्यक्त केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

अमेरिकेने पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सवर अमेरिकेत चार्टर्ड विमान उडवण्यास बंदी घातली आहे. तसेच पीआयएचे परमिट देखील रद्द केले आहे. अमेरिकेआधी कुवैत, इराण, जॉर्डन आणि यूएई यासारख्या मुस्लिम देशांसह व्हिएतनाम, ब्रिटन, मलेशियाने पाकिस्तानी पायलटवर बंदी घातली होती. तसेच युरोपियन युनियन सेफ्टीने सदस्य असलेल्या 32 देशांना यावर तात्काळ निर्णय घेण्याचे आवाहन केले.

तीनमधील एक पायलट बनावट
पाकिस्तानातील दर तीन पायलटमागे एका पायलटचा विमान उड्डाणासाठी लागणारा परवाना हा बनावट आहे. दरम्यान पाकिस्तानने अशाप्रकारचे संशयास्पद परवाने असलेल्या 140 पायलटना विमानांचे उड्डाण करण्यापासून रोखले आहे.

pia

असा झाला खुलासा
पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी एक मोठा विमान अपघात झाला होता. त्याचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानमधील बनावट पायलटचा मुद्दा वर आला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानातील 860 पैकी 262 पायलटचे परवाने बनावट असल्याची कबुली पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या (पीआयए) प्रवक्त्यांनीही दिली.

आपली प्रतिक्रिया द्या