मुलीसोबत सेक्स केल्यास पंधरा वर्षाचा तुरुंगवास

एका चाळीस वर्षाच्या इसमाला 14 वर्षाच्या मुलीसोबत सेक्स करणं चांगलंच अंगाशी आले आहे. या इसमाला  अल्पवयीन मुलीसोबत सेक्स केल्याबद्दल पंधरा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. रॉबर्ट हॅवेरी असे या इसमाचे नाव आहे. अमेरिकेतल्या बोयसे शहरात ही घटना घडली आहे.

रॉबर्ट 2016 पासून एका अल्पवयीन मुलीसोबत सोशल साईटवर चॅट करत होता. त्यांचे चॅट तपासले असता त्यातले बरेच संभाषण सेक्ससंदर्भात होते. चॅटदरम्यान रॉबर्टने या मुलीला भेटण्याची आणि सेक्स करण्याची इच्छा अनेकदा व्यक्त केली होती. काही दिवसानंतर त्या मुलीने आपले काही मादक फोटो रॉबर्टला पाठवले होते. तिचे मादक फोटो पाहून रॉबर्ट उत्तेजित झाला होता. डिसेंबर 2019 मध्ये रॉबर्ट गाडी घेऊन ओरेगॉन शहरात धडकला होता. त्याने तिथून या अल्पवयीन मुलीला आपल्या घरी नेले होते.

रॉबर्टने या मुलीला घरी नेऊन तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले होते. हे सगळं घडत असताना एक अल्पवयीन मुलीसोबत एक प्रौढ व्यक्ती शारिरीक संबंध ठेवत असल्याची  पोलिसांना कुणकुण लागली होती. पोलीस जेव्हा रॉबर्टच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना तो आणि ही अल्पवयीन मुलगी नको त्या अवस्थेत दिसले होते. यानंतर पोलिसांनी रॉबर्टला अटक केली होती. रॉबर्टविरोधात खटला चालवण्यात आला. खटल्यादरम्यान त्याच्याविरूद्धचे आरोप सिद्ध झाल्याने त्याला 15 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या