कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला ‘या’ राज्यात केली जातेय 94 हजारांची मदत

789

जगभरात कोरोनाचा विळखा वाढत असून सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. येथे बाधितांचा आकडा 50 लाखांच्या पार गेलेला असून दीड लाखांवर लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संकटकाळात अनेकांचे रोजगारही हिरावले असून आर्थिक संकटही वाढत आहे. याचमुळे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील एका संस्थेने पॉझिटिव्ह रुग्णाला 94 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. कोरोना काळात लोकांना खाण्यापिण्याचा खर्च, घरभाडे आणि इतर बिल देताना नाकेनऊ येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

कोरोना संक्रमित रुग्णांना दोन आठवडे क्वारंटाईन व्हावे लागत असून अनेकांना आयसोलेशनमधील खर्चही झेपत नाहीय. त्यामुळे कॅलिफोर्नियामधील अलामेडा संस्थेने (कौंटी) अशा पॉझिटिव्ह रुग्णांना मदत करण्याचे ठरवले आहे. लॉस अँजेलेस टाइम्स (Los Angeles Times) ने याबाबत वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, संस्थेच्या बोर्ड सदस्यांनी सर्वसंमतीने कोरोना रुग्णाला 94 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या भीतीने लोकांनी टेस्ट केली नाही अथवा आयसोलेट होऊ शकले नाही तर हा विषाणू पसरण्याचा धोका अधिक आहे, असे बोर्डाचे म्हणणे आहे.

मात्र ही मदत मिळवण्यासाठी काही अटी देखील असून त्या व्यक्तीने पेड सिक लिव्ह घेतलेली नसावी, तसेच तो बेरोजगारी भत्ता घेत नसावा, तरच त्याला याचा लाभ घेता येईल. या निर्णयामुळे लोक स्वतःहून चाचणी करण्यासाठी पुढे येतील असे संस्थेला वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या