… तर हिंदुस्थानच्या मदतीला सैन्य उतरवू, अमेरिकेचा चीनला थेट इशारा

13792

हिंदुस्थान आणि चीनमध्ये सीमारेषेवर तणावाची स्थिती असताना अमेरिकेने पुन्हा एकदा हिंदुस्थानला उघडउघड पाठिंबा दिला आहे. चीनच्या विस्तारवादी भूमिकेला आळा घालण्यासाठी वेळ आलीच तर अमेरिकन सैन्य उतरवू असा थेट इशारा अमेरिकेने दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मार्कस मेडोस यांनी चीनला हा इशारा दिला आहे. चीनच्या सीमा भिडलेला एकही देश सध्या सुरक्षित नाही, असेही मेडोस यांनी यावेळी म्हटले.

गलवान खोऱ्यात हिंदुस्थान आणि चीन आमनेसामने आल्यानंतर दक्षिण चीन समुद्रात अमेरिका आणि चीन यांच्यात तणावाची स्थिती आहे. चीनने तैवानच्या सीमेजवळ युद्ध अभ्यास सुरू केल्यानंतर अमेरिकेने दोन विमानवाहू युद्धनौका या भागात तैनात केल्या. यामुळे चीनने थयथयाट केला. चीनच्या आरोपांवर बोलताना मेडोस म्हणाले की, आमचा इशारा स्पष्ट आहे. आम्ही अशा वेळी मुकदर्शक बनू शकत नाही. चीन असो किंवा अन्य कोणी या भागात कोणालाही वर्चस्व गाजवू देणार नाही. आमचे सैन्य मजबूत असून कोणत्याही संकटाला कस्पटासमान उखडून फेकू, असेही ते म्हणाले.

दरम्यान, अमेरिकेने याआधीही हिंदुस्थानला पाठिंबा दिला आहे. तसेच चीनला रोखण्यासाठी युरोपातील सैन्य हटवून ते आशियाई देशांमध्ये तैनात करण्याची रणनीती देखील आखली आहे. यामुळे चीनवर वचक राहील असे अमेरिकेला वाटते.

सीमेजवळ अपाचे, टी-90 रणगाडे तैनात केल्याने चिनी माकडांचा थयथयाट, सरकारी वृत्तपत्रात युद्धाची भाषा

चीनचे पाऊल मागे
हिंदुस्थानची कुटनीती भूमिका आणि लष्करी ताकद यामुळे चीनने गलवान खोऱ्यातून काढता पाय घेतला आहे. चीनने या भागातून आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली असून तंबू उखडले आहेत. पॉईंट 14 आणि पॉईंट 15 भागात चिनी सैन्य जवळपास दीड किलोमीटर मागे सरकले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या