आमच्याकडून अधिक कर घ्या, जगाला वाचवा; जगातील श्रीमंतांचे आव्हान

581

कोरोना महामारीमुळे जगाचे अपरिमित नुकसान झाले आहे. या स्थितीत हवे तर आमच्याकडून ‘सुपर रिच’ कर घ्या, पण संकटात सापडलेल्या जगाला वाचवा, असे मानवतावादी आवाहन अमेरिकेसह जगभरातील 80हून अधिक कोटय़धीशांनी आपापल्या देशाच्या सरकारला पत्रकाद्वारे केले आहे. या 80 कोटय़ाधीसांच्या गटाचे नाव ‘मिलेनियर्स ऑफ ह्युमॅनिटी’ म्हणजेच ‘मानवतेसाठी करोडपतींची साथ’ असं आहे. श्रीमंत लोकांकडून तातडीने अधिक कर आकारण्यास सुरुवात करण्यात यावी. ही कर वसुली तातडीने, उघडपणे आणि कायमस्करुपी असावी असं या पत्रामध्ये म्हटलं आहे. या श्रीमंतांत बेन अँड जेरीज आइक्रीम कंपनीचे सह संस्थापक जेरी ग्रीनफील्ड, क्रीन रायटर रिचर्च कर्टिस आणि चित्रपट निर्माते एबिलेग डिझनी, अमेरिकेतील उद्योजक सिडनी टोपोल आणि न्यूझीलंडचे व्यवसायिक स्ट्रीफन टिंडल यांचाही समावेश आहे. यासंदर्भातील वृत्त ‘द गार्डियन’ने दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या