दक्षिण आफ्रिकेची ‘जोजिबिनी टूंजी’ ठरली मिस युनिव्हर्स

अमेरिकेतील अटलांटा येथे पार पडलेल्या 68 व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी हिने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब आपल्या नावावर केला. जगभरातील 93 देशातील सौंदर्यवतींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अनेक फेऱ्यांपर्यंत चाललेल्या या स्पर्धेत मिस दक्षिण आफ्रिकेने सर्वांवर मात करत ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला आहे. हा किताब पटकावणारी ती तिसरी दक्षिण आफ्रिकन सौंदर्यवती ठरली आहे. जोजिबिनीच्या या कामगिरीमुळे जगभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

26 वर्षीय जोजिबिनी ही दक्षिण आफ्रिकेतील टोस्लोमध्ये राहाणारी आहे. जोजिबिनी टूंजीला जेव्हा क्राऊन घालण्यात आला तेव्हा तिने एक सुंदर सोनेरी रंगाचा गाऊन घातला होता. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत जोजिबिनीने दक्षिण आफ्रिकेच्या पारंपारिक पोशाखात रॅम्प वॉक केला. अंतिम फेरीत अमेरिका, व्हिएतनाम, व्हेनेझुएला, कोस्टासारख्या देशांच्या सौंदर्यवतींचं आव्हानं तिच्यासमोर होतं. मात्र या सगळ्यांवर मात करत तिनं मिस युनिव्हर्सच्या किताबावर आपलं नाव कोरलं. या स्पर्धत हिंदुस्थानच्या वतीने वार्तिका सिगने भाग घेतला होता. मात्र तिला टॉप 10 मध्ये स्थान मिळवता आलं नाही.

आपली प्रतिक्रिया द्या