
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने जगातील पहिले इलेक्ट्रिक विमान लाँच केले आहे. ‘एक्स -55 मॅक्सवेल’ असे या इलेक्ट्रिक विमानाचे नाव आहे. नासाचे प्रदर्शित केलेले हे संस्थेचे असे पहिले विमान आहे, ज्यात सामान्य लोक ही प्रवास करू शकणार आहेत.
हे विमान इटलीच्या टेकनेम पी2006 टी विमानाच्या अनुरूप बनवण्यात आले आहे. कॅलिफोर्निया येथील इम्पीरियल सिस्टम एरोस्पेसने या विमानाची निर्मिती केली असून, त्यांनी 2 ऑक्टोबर रोजी नासाला हे विमान सोपवले. आर्मस्ट्रॉंग फ्लाइट रिसर्च सेंटरमध्ये एसआरओने एकूण तीन कॉन्फिगरेशनसह हे विमान दिले आहे. नासाच्या मते, एक्स -55 प्रोजेक्टचे मुख्य लक्ष हे वेगाने वाढत चालेल्या इलेक्ट्रिक विमानाच्या बाजारात एक मानक निश्चित करणे आहे. या विमानामुळे भविष्यात सर्वसामान्यांसाठी यातायात अधिक सुलभ होईल, असे नासाने म्हटले आहे.
या आहेत विमानाच्या खास बाबी
अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे हे एक्स -55 विमान अनेक गोष्टींमुळे खास ठरते. यात रिचार्ज करण्यासाठी लिथियम-आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, विमानाची गती वाढविण्यासाठी विमानाच्या पंखांवर डझनभर मोटर्स देखील लावल्या गेल्या आहेत.
- या विमानाच्या निर्मितीसाठी 20 वर्षाचा कालावधी लागला आहे.
- या विमानात चार लोक प्रवास करू शकतात.
- यात 14 इलेक्ट्रिक क्रूझर मोटर्सचा वापर करण्यात आल्या आहेत.
- भविष्यात याचा वापर शहरी टॅक्सी म्हणून केला जाईल.
- या विमानामुळे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत होणार आहे.