हाफिज सईदला फासावर लटकवा, अमेरिकेची मागणी

मुंबई हल्लाचा मास्टरमाईंड व जमात उद दवाचा म्होरक्या हाफिज सईद याला काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात अटक झाली आहे. अटक झाली असली तरी अद्याप हाफिजवर कोणताही खटला सुरू झालेला नाही.

हाफीज सईद अटकेनंतर आता अमेरिकेने त्याला फासावर लटकविण्याची मागणी केली आहे. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंट दक्षिण व मध्ये आशियाई ब्युरोचे प्रमुख अॅलिस वेल्स यांनी ही मागणी केली आहे. ‘पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाच्या भविष्यासाठी दहशतवाद्यांना त्यांच्या देशात  स्थान देऊ नये. पाकिस्तानने हाफिज सईद व इतर लष्कर ए तोयबाच्या दहशतवादग्यांना अटक केली हे चांगलेच आहे. मात्र हाफिज सईदने ज्या प्रकारे हल्ले केले आहेत त्यामुळे त्याला पाकिस्तानने फासावरच लटकवलं पाहिजे’,असे वेल्स यांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या