अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

अमेरिकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणूक प्रचारामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. शुक्रवारी कोरोनाबाधितांच्या दिवसभरातील संख्येने विक्रमच केला आहे.

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने अमेरिकेची चिंता वाढली आहे. अमेरिकेत शुक्रवारी 84,218 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गुरुवारी 76,195 नवे कोरोनाबाधित आढळले होते.

अमेरिकेत कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2,30,068 वर गेली आहे. अमेरिकेत कोरोनाचा असाच प्रकोप सुरू राहिला तर फेब्रुवारीपर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंची संख्या 5 लाखांवर पोहचेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या