रशियाची कोरोनावरील लस माकडांच्याही लायकीची नाही, अमेरिकेने उडवली खिल्ली

1421

रशियाने कोरोनावर लस बनवल्याचा दावा केला आहे. परंतु अमेरिकेने या लशीची खिल्ली उडवली आहे. ही लस माकडांच्या लायकीचीही नाही असे अमेरिकेने म्हटले आहे. तसेच चीनने लस बनवण्यात मोठी मेहनत घेतली आहे असे म्हणत अमेरिकेने चीनची प्रशंसा केली आहे.

रशियाने कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला आहे. तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मुलीला ही लस दिल्याचे पुतीन यांनी सांगितले होते. जगभरातून 100 कोटींहून अधिक लशींची ऑर्डर रशियाला आली आहे. पण पाश्चिमात्य देशांनी या लशीवर संशय व्यक्त केला आहे. तसेच रशियाने या लशीची माहिती चोरल्यावरून अमेरिकेने रशियावर आगपाखड केली होती. आता ही लस माकडांच्याही लायकीची नाही असे म्हणत अमेरिकेने रशियन लशीची खिल्ली उडवली आहे. तसेच अशा प्रकारच्या लशीची चाचणी आम्ही माकडांवर करतो असेही अमेरिकेने म्हटले आहे.

अमेरिकेने नेहमीच रशियाकडे संशयाच्या नजरेने पाहिले आहे. रशियाने लशीसंदर्भात सर्व माहिती अमेरिकेला देण्याची तयारी दाखवली आहे. इतकेच नाही तर लशीचे नमुने देण्यासही रशिया तयार आहे. पण अमेरिकेने रशियाकडून कुठल्याही प्रकारची मदत घेण्यास नकार दिला आहे. पण रशियाने अर्धवट संशोधन करून ही लस बनवल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. तसेच रशियाने या लशीची मोठ्या प्रमाणावार चाचणी केली नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेत जी लस बनवली जात आहे, ती सर्व प्रकारच्या चाचण्या आणि उच्च मानकातून तिचे संशोधन होत आहे. अमेरिकेत जी लस शोधली जात आहे, तिचा सध्या तिसरा टप्पा सुरू असल्याचेही अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

असे असले तरी काही अमेरिकन कंपनीने रशियन लशीत स्वारस्य दाखवल्याच रशियाने म्हटले आहे. परंतु रशियाने एकाही कंपनीचे नाव सांगितले नाही. तर दुसरीकडे अमेरिकेने लशीसंदर्भात चीनची प्रशंसा केली आहे. लस शोधण्याच्या शर्यतीत चीन सर्वात पुढे आहे असे अमेरिकेन म्हटले आहे. चीनने कोरोना लशीचा विषय अतिशय गांभीर्याने घेतला असून ते लस शोधण्यात जवळ पोहोचले असल्याचेही अमेरिकेने नमूद केले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या