दक्षिण चीनच्या सागरात चीनचा विस्तारवाद खपवून घेणार नाही; अमेरिकेचा इशारा

1006

दक्षिण चीनच्या सागरी भागातील काही बेटे आणि सागरी हद्दीबाबतचे चीनने केलेले सर्व दावे अमेरिकेने फेटाळून लावले आहेत. दक्षिण चीनच्या समुद्रात चीनचा विस्तारवाद खपवून घेणार नाही, असा इशाराही अमेरिकेने दिला आहे. चीनकडून करण्यात येणाऱ्या क्षेत्राबाबत कोणतेही पुरावे, दस्तावेज किंवा आधार नाही. चीन फक्त मनमानी पद्धतीने आपले क्षेत्र वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. चीनचा हा विस्तारवाद कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

इतर देशांचे भूभाग हडपण्याचे प्रकार, विस्तारवाद अशा कोणत्याही घटनांना आजच्या काळात काहीही स्थान नाही. दक्षिण चीनच्या समुद्राला चीन आपले साम्राज्य समजत आहे. मात्र, चीनचा मनमानीपणा खपवून घेणार नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांनी स्पष्ट केले आहे. दक्षिण पूर्वेतील आमच्या मित्रदेशांचे सार्वभौमत्व आणि त्यांच्या प्रदेशाच्या रक्षणासाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सागरी हद्द आणि सागरी सुरक्षेच्या दृष्टीने आपण आतंरराष्ट्रीय समुदायासोबत आहोत. दक्षिण चीनच्या समुद्रात आपले सर्वाधिक सामर्थ असून आपण करू ते सर्व योग्य असे चीनचे धोरण आहे. मात्र, चीनचा हा मनमानीपणा खपवून घेणार नाही. तसेच दक्षिण चीन समुद्र आणि सागरी हद्दीबाबत त्यांनी केलेले सर्व दावे अमेरिका फेटाळत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या