हिजबुल मुजाहिदीन जागतिक दहशतवादी संघटना – अमेरिका

36

सामना ऑनलाईन । वाशिंग्टन

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करणाऱ्या हिजबुल मुजाहिदीन या पाकिस्तान पुरस्कृत संघटनेला अमेरिकेने दणका दिला आहे. जागतिक दहशतवादी संघटना असल्याचा ठपका ठेवून अमेरिकेने हिजबुल मुजाहिदीवर बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या घोषणा ही कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांसाठी विविध प्रकारची मदत पुरवणाऱ्या पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे.

अमेरिकेच्या सरकारी वेबसाईटवर हिजुबल संदर्भातल्या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. जागतिक स्तरावर पाकिस्तानचा बुरखा फाडण्याच्या हिंदुस्थानच्या प्रयत्नांना यामुळे आणखी बळकटी मिळाली आहे. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला जागतिक दहशतवादी संघटना ठरवल्यामुळे अमेरिकेमध्ये या संघटनेची संपत्ती जप्त करण्यात येईल. तसेच अमेरिकेतील नागरिकांनाही या संघटनेसोबत कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवता येणार नाही.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी अमेरिकेने हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन याला जागतिक दहशतवादी ठरवले होते. अमेरिकेच्या या निर्णयाला उत्तर देताना सलाउद्दीनने अमेरिकेचा निर्णय म्हणजे मोठा मुर्खपणा असल्याचे म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या