पाकिस्तानला दणका! 2100 कोटींची मदत अमेरिकेने रोखली

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अमेरिकेने मोठा झटका दिला आहे. पाकिस्तानला देण्यात येणारी 2100 कोटी रुपयांची लष्करी मदत रद्द करण्याचा निर्णय अमेरिकेच्या लष्कराने घेतला आहे. दहशतवादाविरोधात पाककडून अद्यापि ठोस कारवाई होत नाही असे स्पष्ट करून ही मदत रोखली आहे.

अमेरिकेकडून देण्यात येणाऱ्या निधीचा उपयोग हा वेगळ्याच कामासाठी केला जाईल अशी भीती अमेरिकी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल कोनी फॉकनर यांनी व्यक्त केली.

summary- america-stopped-funding to-pakistan