लाचार पाकिस्तानची अमेरिकेने केली आणखी मोठी गोची

31
फोटो-ANI

सामना ऑनलाईन,वॉशिंग्टन

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकड्यांची कंबर साफ मोडायची असं बहुधा ठरवलेलं दिसतंय. कारण अमेरिकेकडून इतर देशांना जी आर्थिक मदत दिली जाते त्यामध्ये २८ टक्के कपातीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. पाकिस्तान सारखी कंगाल राष्ट्र अमेरिकेच्या या मदतीच्या तुकड्यांकडे आशाळभूतपणे बघत असायची. अमेरिकेचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, त्यासाठीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.  यातील महत्वाचा प्रस्ताव होता तो म्हणजे संरक्षणासाठी भरीव तरतूद करणे. संरक्षणासाठी ५४ अब्ज डॉलर्सची वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याच जोडीने दुसरा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे तो म्हणजे इतर राष्ट्रांना देण्यात येणाऱ्या मदतीचा

९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा ओघ वाढवण्यात आला होता. पाकिस्तानव्यतिरिक्त इजिप्त, जॉर्डन,इराक अफगाणिस्तानसारख्या मुस्लिमबहुल देशांना अमेरिका आर्थिक मदत देत होती. मदत कपातीचा निर्णय मंजूर करण्यात आला तर या सगळ्या देशांना त्याचा फटका बसले. खासकरून पाकड्यांना त्याचा जास्त फटका बसेल कारण अमेरिकेच्या आर्थिक मदतीच्या जीवावरच पाकडे फार उड्या मारत होते. अमेरिकेकडून पाकिस्तानला ७४ कोटी डॉलर्सची मदत मिळत होती. इतर राष्ट्रांना कमी मदत करायची आणि अमेरिकेची तिजोरी भरण्यावर लक्ष द्यायचं असं धोरण ट्रम्प यांनी अवलंबिले आहे, त्यामुळेच हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या