महिलेचे नशीब चमकले, 400 रुपये खर्च करुन ती बनली करोडपती

एका महिलेचे नशीब चांगलेच चमकले आहे. केवळ 400 रुपये खर्च करुन ही महिला कोट्याधीश झाली आहे. महिलेने एक लॉटरी तिकीट काढले होते. त्यात महिलेला लॉटरी लागली. महिलेला तिच्या नशीबावर विश्वासच बसत नव्हता.

अमेरीकेतील मिशीगन येथे राहणाऱ्या महिलेने आपले नशीब आजमावण्यासाठी 400 रुपयांच्या लॉटरीचे तिकीट खरेदी केली होते. या महिलेची ओळख अद्याप सामाईक केलेली नाही. महिलेने आपल्या गाडीत बसून लॉटरी तिकीटवरचा नंबर पुन्हा पुन्हा तपासला. त्यावेळी तिला कळले की तिला दीड कोटींची लॉटरी लागली आहे. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर महिलेने कित्येक वेळा त्या तिकीटवरचा नंबर आपल्यालालच लागला आहे ना याची खातरजमा केली.

अनेकदा ते तिकीट तपासल्यानंतर कळले की, महिलेला दीड कोंटींची लॉटरी जिंकली आहे. त्यानंतर महिलेने ही बातमी आपले नातेवाईक आणि मित्रमंडळींना दिली. तिच्या आनंदाला पारा उरला नव्हता. 41 वर्षीय महिलेने सांगितले की, जिंकलेल्या रक्कमेतून ती शिल्लक आपली बिले भरणार. त्यानंतर सुट्टीवर जाण्याचेही प्लॅनिंग आहे. तसेच जिंकलेले पैसे सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करणार. महिलेने हे तिकीट क्रॉसवर्ड टाईम्स 5 तिकीट ्यूजर्सीच्या ट्रंटन शहात खरेदी केली होती.