‘होम अलोन’मध्ये तुम्ही ट्रम्पना पाहिले होते का? ट्रम्प कलाकारही आहेत

1131
donald-trump-home-alone

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याआधी त्यांच्यासंदर्भातील विविध प्रकारची माहिती समोर येत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की डोनाल्ड ट्रम्प हे केवळ उद्योगपती आणि राजकारणीच नाही तर ते कलाकार देखील आहेत. त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. होम अलोन या चित्रपटात लहान मुलाला मार्ग शोधताना मदत लागते. त्यावेळी ट्रम्प या मुलाल मदत करतात.

द लिटिल राक्सल्स 1994

ट्रम्प यांनी या चित्रपटात वाल्डोच्या वडिलांची भूमिका केली होती. त्यांची पाहुणे कलाकाराच्या भूमिकेची बरीच चर्चा झील होती. या विनोदी चित्रपटात ‘पैशांनी तुझ्यापेक्षा चांगला मुलगा खरेदी करता येऊ शकत नाही’, असं एक वाक्य त्यांनी म्हटलं आहे.

द एसोसिएट 1996

डोनाल़्ड ट्रम्प या चित्रपटात व्हूपी गोल्डबर्ग यांच्यासोबत पाहायला मिळाले. हा विनोदी चित्रपट वॉल स्ट्रीटशी निगडित होता. ट्रम्प यांनी स्वत:चीच भूमिका यात वठवली.

सडनली सुसेन 1997

या शो मध्ये एका भागात उद्योगपतीची भूमिका साकारत असताना ट्रम्प हे पोकर गेम खेळताना पाहायला मिळाले. जुड नेल्सन आणि जॉन मॅक्नरो यांच्यासोबत ते खेळताना पाहायला मिळाले.

स्पिन सिटी 1998

स्पिन सिटी नावाच्या एका प्रसिद्ध शो मध्ये ट्रम्प सुपरस्टार मायकल फॉक्स यांच्यासोबत दिसले. यामध्ये ट्रम्प आपल्या पुस्तकांविषयी सांगतात. या पुस्तकांची नावं द आर्ट ऑफ द डील आणि आर्ट ऑफ द कमबॅक अशी होती.

सेक्स अँड द सिटी 1999

ट्रम्प या शो च्या दुसऱ्या सिझनमध्ये दिसले. एका 70 वर्षाच्या महिलेला ते आपल्यासोबत प्रेम करावं म्हणून प्रयत्न करताना दिसले.

जूलैंडर 2001

बेन स्टीलरने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात अनेक सेलिब्रिटी होते. ट्रम्प यांनी देखील यामध्ये रेड कार्पेटवर वॉक केलं होतं.

टू वीक नोटीस 2002

या चित्रपटात ट्रम्प यांनी पुन्हा एकदा उद्योगपतीची भूमिका निभावली. एका कॉटेल पार्टमध्ये ते दिसले.

आपली प्रतिक्रिया द्या