‘शट-अप मिस्टर ट्रम्प, तुम्ही अमेरिकेचे सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष आहात’

‘शट-अप मिस्टर ट्रम्प, तुम्ही अमेरिकेचे सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष आहात’ असे जो बायडेन म्हणाले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा लालबुंद झाला होता. हे दोघेही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे आहेत. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवारांमध्ये वादविवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्याची अमेरिकेत परंपरा आहे. या वादविवादांमध्ये ट्रम्प-बायडेन यांच्यात एकमेकांपेक्षा वरचढ होण्याची स्पर्धा लागली आहे.

दोघेही एकमेकांना प्रश्न विचारून, टीका करून स्वतŠला श्रेष्ठ ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. बायडेन यांनी अमेरिकेतील कोरोना परिस्थितीवरून ट्रम्प यांच्यावर टीका केली. त्यावर ट्रम्प यांनी ‘तुम्ही राष्ट्राध्यक्ष असता तर कोरोनामुळे 20 कोटी नागरिकांचे बळी गेले असते’ असे प्रत्युत्तर दिले. वादविवादावेळी मास्क लावल्याबद्दलही ट्रम्प यांनी अनेकदा बायडेन यांना लक्ष्य केले.

बायडेन यांनी ट्रम्प यांना करचुकवेगिरीबद्दल यावेळी दोषी मानले. 2016-17 मध्ये ट्रम्प यांनी फक्त 750 डॉलर्स इतकाच कर भरल्याचा आरोप बायडेन यांनी केला. त्यासाठी त्यांनी ‘न्यूयॉर्प टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा आधार दिला. त्यावर आपण लाखो रुपये कर भरल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांनी कर भरल्याचे पुरावे सादर करावे अशी मागणी बायडेन यांनी केली. त्यावर लवकरच आपण ती सादर करून असे ट्रम्प यांनी सांगितले. या वादविवादावेळी दोघांमध्ये इतकी हमरीतुमरी झाली की कार्यक्रमाचे संचालन करणारे क्रिस वॉलेस यांना अनेकदा मध्यस्थी करावी लागली.

आपली प्रतिक्रिया द्या