पाकिस्तानच्या राष्ट्रपती भवनात माझ्यावर बलात्कार केला, महिलेचे माजी मंत्र्यांवर गंभीर आरोप

8678

अमेरिकेतील ब्लॉगर सिंथिया रिची हिने पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री रहमान मलिक यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे आरोप केले आहेत. रहमान मलिक यांच्यासोबतच तिने माजी पंतप्रधान युसुफ रझा गिलानी व माजी मंत्री मखदुम शहाबुद्दीन यांनी देखील तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप तिने केला आहे.

बिलावल भुट्टो झरदार यांच्या पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या नेत्यांवर सिंथियाने एका व्हिडीओ द्वारे हे आरोप केल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यावेळी बिलावल यांचे वडिल असिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे राष्ट्रपती होते. ‘2011 मध्ये मला काही अमली पदार्थ देऊन माझ्यावर इस्लामाबादमधील राष्ट्रपती भवनात रहमान मलिक यांनी बलात्कार केला. तत्कालिन पंतप्रधान युसुफ रझा गिलानी व माजी मंत्री मखदुम शहाबुद्दीन यांनीही माझ्यासोबत अश्लील वर्तन केले’असा आरोप सिंथियाने फेसबुकवरून लाईव्ह जात केला आहे. सिंथियाने तिच्याकडे या प्रकरणातले सर्व पुरावे असल्याचा दावाही केला आहे. व्हिडीओ शेअर करण्याआधी तिने ‘झरदारी यांची पीपीपी पार्टी मला धमकवत आहे. कारण त्यांना माहिती आहे की गेली अनेक वर्ष पीपीपीच्या नेत्यांकडून माझ्यावरमाझ्यावर बलात्कार, अत्याचार झाला. त्यांना ते जगाला कळू द्यायचे नाही.’ असे ट्विट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या