दीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण

68

सामना ऑनलाईन । मुंबई

दीपिका पदूकोण ही सध्या बॉलीवूडमधली आघाडीची अभिनेत्री आहे. मात्र सध्या दीपिकाच्या एका निर्णयामुळे तिचे चाहते तिच्यावर भडकले असून तिच्याबाबतची नाराजी व्यक्त करण्यासाठी ट्विटरवर #NotMyDeepika हा हॅशटॅग देखील सुरू करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी दीपिका व रणवीर कपूर हे दिग्दर्शक लव्ह रंजन यांच्या घरातून बाहेर पडताना दिसले. त्यांचे रंजन यांच्या घरातून बाहेर पडतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रंजन यांच्यावर #MeToo मोहीमेच्यावेळी लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. त्यामुळे असे आरोप असलेल्या दिग्दर्शकासोबत दीपिका काम करणार असल्याची चर्चा सध्या बीटाऊनमध्ये रंगली आहे. मात्र या चर्चेमुळे दीपिकाचे चाहते व्यथित झाले असून त्यांनी तिच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यासाठी #NotMyDeepika हा हॅशटॅग सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या