अमित साध पुन्हा पोलिसाच्या भूमिकेत

अभिनेता अमित साध याने आगामी ‘मैं’ चित्रपटाला नुकतीच मुंबईत सुरुवात केली. शूटिंगचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मैं’ चित्रपटात अमित साध याच्यासोबत ईशा देओ, सीमा बिस्वास, तिग्मांशु धुलिया आणि मिलिंद गुणाजी अशा काही प्रतिभावान कलाकारांनी काम केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित चित्रपट निर्माते सचिन सराफ यांनी केले आहे.