विरोधकांच्या हाहाकारावर अमित शहांचा जयजयकार

29
amit-shah

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जय शाह याच्या कंपनीच्या टर्नओव्हर प्रकरणी अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आजतक या खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी आपल्या मुलाच्या कंपनीविषयी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.

जय शाह याच्या कंपनीचा टर्नओव्हर पाच हजारावरून ८०.५ कोटी रुपये इतका झाला आहे. त्याच्यावर स्पष्टीकरण देताना अमित शाह म्हणाले की, काँग्रेसवर स्वातंत्र्यानंतर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले गेले. पण, त्यावर कधीही काँग्रेसने मानहानीचा खटला दाखल केला नाही. इथे तर जयच्या कंपनीवर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप लागलेला नाही. जर, भ्रष्टाचाराचे आरोप खोटे होते, तर काँग्रेसने त्याचवेळी त्यावर का प्रतिक्रिया दिली नाही. तसं इथे अजिबात घडलेलं नाही. बाजू खरी आहे म्हणूनच जयने स्वतःहून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

अमित शाह यांनी आपल्या मुलाची बाजू घेताना असं म्हटलं की, माझ्या मुलाने सरकारसोबत एका रुपयाचाही व्यवहार केलेला नाही. कोणतीही सरकारी जमीन हस्तगत केलेली नाही. विरोधकांना फक्त कोटींचा टर्नओव्हर दिसतोय, व्यापारातला प्रत्यक्ष तोटा दिसत नाही. आजघडीला जयला त्याच्या व्यापारात दीड कोटींचा तोटा आहे. पण, त्यावर कोणीही काहीही बोलत नाही. यात कुठेही एका पैशाचाही गैरव्यवहार झाला नसून, सर्व व्यवहार चेकच्या स्वरूपात आणि बँकेच्या माध्यमातून झाले आहेत.

जय शाह यांच्याप्रमाणे अन्य छोट्या कंपन्यांना कर्ज मिळू शकेल का, या प्रश्नावर उत्तर देताना अमित शाह यांनी जयला लोन मिळालं नसल्याचं स्पष्ट शब्दांत सांगितलं. त्याला लेटर ऑफ क्रेडिट मिळाले होते. आणि त्याचे सर्व पैसे चुकते करण्यात आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

आपली प्रतिक्रिया द्या