उलाढाल मोठी, पण जय शहा घाटय़ातच, अमित शहांनी मुलावरील आरोप फेटाळले

62
amit-shah

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

माझा मुलगा जय शहा याच्या ‘टेम्पल इंटरप्रायझेस’ या कंपनीची उलाढाल ८० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली हे खरे, पण कंपनीला दीड कोटीचा तोटा झाल्यामुळे तो घाटय़ातच राहिला, असा दावा करून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या मुलावरील भ्रष्टाचार, गैरव्यवहाराचे आरोप आज फेटाळून लावले.

जय शहा याचा व्यापार शेअर बाजाराचा असून त्यात उलाढाल मोठी असते, पण नफा मात्र कमी असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. माझ्या मुलाच्या कंपनीत कोणताही अनागोंदी कारभार झालेला नाही. त्याने सरकारी पैसा किंवा भूखंड घेतलेला नाही. त्यामुळे यात भ्रष्टाचाराचा प्रश्नच येत नाही असे अमित शहा म्हणाले. जय याने बोफोर्ससारखी दलाली केली नाही, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.

माझ्या मुलाच्या कंपनीच्या प्रकरणात ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी ते कोर्टात सादर करावेत. कोर्टच आता काय तो निर्णय घेईल असे सांगत शहा यांनी विरोधकांना आव्हानच दिले.

माझा मुलगा जय याने आरोप करणाऱयांवर लगेचच अब्रुनुकसानीचा खटला भरून चौकशीची मागणीही केली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या एका तरी काँग्रेस नेत्याने आजवर असा खटला दाखल केला काय?
– अमित शहा, अध्यक्ष, भाजप

आपली प्रतिक्रिया द्या