ते शब्द वापरायला नको हवे होते, गृहमंत्री अमित शहा यांनी टोचले राज्यपाल कोश्यारी यांचे कान

amit-shah

राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरे सुरू करण्याबाबत पत्र लिहिले होते. त्यात तुम्ही सेक्युलर झालात का असा प्रश्न विचारला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोश्यारी यांना संविधानाची आठवण करून दिली होती. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांने कोश्यारी यांचे कान टोचले आहेत. असे शब्द कोश्यारी यांनी वापरायला नको हवे होते असे मत शहा यांनी व्यक्त केले आहे.

News 18 Hindi या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना शहा यांना पत्राबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अमित शहा म्हणाले की, “ते पत्र मी वाचले, मलाही असे वाटते की राज्यपाल कोश्यारी यांनी अशा प्रकारचे शब्द वापरायला नको हवे होते.”

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर शहा म्हणाले की हा निवडणुकीचा मुद्दा झालेला आहे की नाही याची आपल्याला कल्पना नाही. परंतु हा मुद्दा आपण निर्माण झालेला नाही. सुरूवातीलाच जर हे प्रकरण सीबीआयकडे दिले असते तर एवढा गदारोळ झाला नसता. आजही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण सीबीआय कडे देण्यात आले आहे. फक्त सुशांत सिहंच नव्हे तर कुठल्याही व्यक्तीचा अशा प्रकारे मृत्यू झाला असता तर त्याचा तपास निष्पक्षपणे झाला पाहिजे असे मत शाह यांनी व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या