नेहरूंच्या चुकीमुळेच कश्मीरचा काही भाग पाकिस्तानकडे – अमित शहा

1228

‘जवाहरलाल नेहरू यांनी जर शस्त्रसंधीचा करार केला नसता तर आज पाकव्याप्त कश्मीर देखील हिंदुस्थानचाच भाग असता. नेहरूंच्या एका चुकीमुळेच कश्मीरचा काही भाग पाकिस्तानकडे आहे’, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. मुंबईत झालेल्या जाहीर सभेत बोलताना अमित शहा यांनी जवाहरलाल नेहरू व राहुल गांधी यांच्यासह विरोधकांवर निशाणा साधला.

‘1947 नंतर कश्मीरचे हिंदुस्थानात विलीनीकरण करण्याची जबाबदारी जवाहरलाल नेहरू यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनी त्याबाबत कश्मीरचे राजा हरि सिंह यांना सांगितले. मात्र हरि सिंह यांनी कश्मीरला हिंदुस्थानात समाविष्ट करण्यास नकार दिला होता. त्यानंतर ऑक्टोबर 1947 ला पाकिस्तानी घुसखोरांनी कश्मीरवर हल्ला केला, तेव्हा मात्र हरि सिंह यांनी कश्मीर हिंदुस्थानात विलीन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हिंदुस्थानी लष्कर पाकिस्तानमधून आलेल्या सर्व घुसखोरांना एका एका भागातून हाकलत होते. मात्र हिंदुस्थानी लष्कर त्या घुसखोरांशी लढा देत असतानाच जवाहरलाल नेहरूंनी  अचानक कश्मीरमध्ये शस्त्रसंधी लागू केली. त्यामुळे मग घुसखोरांच्या ताब्यात असलेला भाग पाकव्याप्त कश्मीर झाला’, अशी टीका शहा यांनी यावेळी केली.

आपली प्रतिक्रिया द्या