अमित शहा स्वातंत्र्यदिनी कश्मीरात जाणार, श्रीनगरच्या ‘लाल चौकात’ तिरंगा फडकावणार

1184

जम्मू -कश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम हटविल्यानंतर आता देशाच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 ऑगस्टला श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकावणार आहेत. 14 ऑगस्टलाच कश्मीरात दाखल होण्याची योजना गृहमंत्री शहा यांनी आखल्याचे वृत्त आहे.

यापूर्वी 26 जानेवारी 1992 रोजी दहशतवादी संघटनांच्या धमक्यांना भीक न घालता तत्कालीन भाजप अध्यक्ष मुरली मनोहर जोशी आणि त्यावेळी संघ प्रचारक म्हणून कार्यरत असणारे नरेंद्र मोदी यांनी लाल चौकात तिरंगा फडकावला होता.

केंद्रातील एनडीए सरकारने नुकतेच जम्मू कश्मीरचे 370 कलम रद्द करीत कश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित केले आहे. शिवाय लडाखचा भाग जम्मू -कश्मीरपासून वेगळा केला आहे. त्यामुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन कश्मीरात तिरंगा फडकावून संस्मरणीय करण्याचे ध्येय अमित शहा यांनी ठेवले आहे. शहा यांनी लालचौकात तिरंगा फडकावल्यावर ते प्रथमच गृहमंत्री म्हणून 16 आणि 17 ऑगस्टला लडाखचा दौरा करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या