अमिताभ बच्चन दिसणार तृतीयपंथीयाच्या भूमिकेत

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन यांनी एका पेक्षा एक सरस भूमिका केलेल्या आहेत. त्यांच्या आतापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा सर्वात वेगळी भूमिका ते आगामी चित्रपटात साकारणार आहेत. अमिताभ बच्चन हे ‘कंचना’ या चित्रपटात तृतीयपंथीयाची भूमिका करणार आहेत.

आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार कंचना हा चित्रपट तमिळ हॉरर चित्रपट मुनी -2 वर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत म्हणजेच राघवच्या भूमिकेत दिसणार आहे. कंचनाचा आत्मा तिच्या मारेकऱ्यांचा बदला घेण्यासाठी राघवच्या शरीरात शिरतो. या चित्रपटात किआरा आ़डवाणी ही अक्षय कुमारच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटींग नुकतेच सुरू झाले आहे.